Ramraje Naik Nimbalkar PC : मास्टमाईंड मी आहे का? रामराजेंचा सवाल
Continues below advertisement
फलटण (Phaltan) येथील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे, माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील 'मास्टरमाईंड'च्या आरोपांना उत्तर दिले आहे. 'जशी एसआयटी या मुलीच्या, कैलासवासी डॉक्टर संपदाच्या मृत्यूची लावली, तशी डीवायएसपी दास साहेबांचीही आम्हाला वेगळी एसआयटी लावून पाहिजे, ही मागणी मी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे करतोय,' असे स्पष्ट वक्तव्य रामराजे यांनी केले. आपल्यावर होत असलेले सर्व आरोप फेटाळून लावताना, त्यांनी डीवायएसपी दास यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचार झाल्याचा आणि २७७ बनावट केसेस दाखल केल्याचा आरोप केला. ही प्रकरणे उच्च न्यायालयात नेण्याचा इशाराही त्यांनी दिला. डॉ. संपदा प्रकरणी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले आणि फलटण तालुक्याच्या बदनामीबद्दल चिंता व्यक्त केली.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement