Rameshbabu Praggnanandhaa : भारताचा बुद्धीबळपटू प्रज्ञानानंदची अंतिम फेरीत धडक : ABP Majha
भारताचा 18 वर्षांचा ग्रॅण्डमास्टर रमेशबाबू प्रग्नानंदाने फिडे वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत नवा इतिहास रचलाय. त्याने अमेरिकेच्या फॅबियानो करुआनाचा 2.5-1.5 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. सर्वात कमी वयात फिडे वर्ल्ड कपची जेतेपदाची लढत खेळणारा तो भारतीय बुद्धीबळपटू ठरलाय. 21 वर्षांपूर्वी विश्वनाथन आनंदने या स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविले होते.