Ramesh Kere Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फक्त राजकीय फायदा उचलला जातोय

Continues below advertisement

Ramesh Kere Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचा फक्त राजकीय फायदा उचलला जातोय 

लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha Election) आता विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी देखील वाढल्या असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची विधानसभा उपाध्यक्ष आणि अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) आणि भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kambhoj) आणि रमेश केरे पाटील यांनी भेट घेत घेतली. या भेटीमागचे कारण अद्याप गुलदस्त्यात असेल तरी भेटी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.   विधानसभा निवडणुकीमुळे आता सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीदेखील वाढल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून सध्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून नरहरी झिरवाळ यांची थेट उमेदवारी जाहीर केली. यावर शिवसेना शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता अचानक विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.   नरहरी झिरवाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात 20 मिनिट चर्चा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेघदूत निवासस्थानी भेट घेतली. नरहरी झिरवाळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या 20 मिनिट चर्चा झाली. या भेटीबाबत नरहरी झिरवाळ यांना विचारले असता ते म्हणाले की, मला उपमुख्यमंत्र्यांना भेटायचे असेल तर एक ठराविक काम नसते. माझे अनेक काम असतात, अनेक प्रश्न असतात. त्यामुळे त्यांची भेट घेतली की, सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram