Ramdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवर
Ramdas Tadas on ShivRaj Rakshe| शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड सस्पेंड, रामदास तडस अॅक्शन मोडवर
Maharashtra Kesari 2025: महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला (Maharashtra Kesari 2025) शेवटच्या दिवशी (2 फेब्रुवारी) गालबोट लागले. गादी विभागातील अंतिम लढतीत पराभूत घोषित केल्याचा पंचाचा निर्णय अमान्य करत नांदेड येथील पैलवान शिवराज राक्षे (Shivraj Rakshe) याने आखाड्यातच पंचाची कॉलर पकडली. त्यांना लाथही मारली. त्यामुळे कुस्तीच्या मैदानावर एकच गोंधळ उडाला. याप्रसंगी पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत शिवराज राक्षे व त्याच्या सहकाऱ्यांना मैदानाबाहेर काढले. तसेच घडलेल्या या प्रकरानंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.
लढत अखेरच्या मिनिटांत असताना चढाओढीत महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) पुन्हा एकदा पंचांकडून ताकीद देण्यात आली. या वेळी पृथ्वीराज मोहोळने थोडा चपळपणा दाखवत महेंद्र गायकवाडला ताकदीने कक्षाच्या बाहेर नेत एका गुणाची कमाई केली. याच गुणाला महेंद्र गायकवाडने आणि त्याच्या संघाने आक्षेप घेतला. लढतीची 16 सेकंद राहिली असताना पृथ्वीराज मोहोळ 2-1 असा आघाडीवर होता. त्याक्षणी आक्षेप फेटाळल्याने महेंद्र गायकवाड मॅटवरून बाहेर पडला आणि पुन्हा परतलाच नाही. यानंतर पृथ्वीराज मोहोळला (Pruthviraj Mohol) महाराष्ट्र केसरी किताब देण्यात आला. महाराष्ट्र केसरीच्या सामन्यानंतर महेंद्र गायकवाडच्या समर्थकांनी गोंधळ घातल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. महाराष्ट्र केसरीचा उपांत्य फेरीचा सामना सुरू असताना शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांचा कुस्ती रंगली असताना असताना एका मिनिटात पृथ्वीराज मोहोळ याने शिवराज राक्षे याला चितपट केले होते... मात्र हा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नसल्याने त्याने पंच दत्तात्रय माने यांच्याशी वाद घालून त्यांना लाथ मारल्याचा प्रकार घडला होता... या घटनेच्या निषेधार्थ आता सर्व पंचांनी एकत्र येत संपूर्ण सामने संपल्यानंतर निषेध व्यक्त केला...तर अंतिम सामन्यात मेहेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सुरू असताना त्याने 16 सेकंद आधीच कुस्तीचे मैदान सोडून दिले आणि पंचांच्या अंगावर धावून गेला या दोन्ही खेळाडूंवर राज्य कुस्तीगीर परिषदेने तीन वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आलीये...खर तर कुस्ती हा शिस्तप्रिय खेळ आहे...मात्र खेळाडू वृत्ती न जपता गायकवाड आणि राक्षे यांनी बेशिस्तपणा दाखवल्याने कुस्तीगीर संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.