Pawar vs Mohol: अजित पवारांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, राजकारणमध्ये आणू नये

Continues below advertisement
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यात राजकीय संघर्ष पेटला आहे. ‘अजित पवारांच्या काळात खेडाचं नुकसान झालं’, असा थेट आरोप महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी केला आहे. अजित पवारांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळातील हिशेब दिला नाही आणि खेळाडूंकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेऊन माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांना संधी द्यावी, अशी मागणी तडस यांनी केली. दुसरीकडे, बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात यावे, या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मुंबईत मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मात्र विरोध केला असून, हा मोर्चा स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola