Ramdas kadam : रामदास कदमांची स्फोटक पत्रकार परिषद, शिवसेनेचा अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर

Continues below advertisement

Dispute in Shivsena : रत्नागिरी जिल्ह्यात सध्या नगरपरिषद निवडणुकांच्या घडामोडींमध्ये शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला देखील जोरात सुरूवात झालेली आहे. अर्थात या सर्वांच्या केंद्र स्थानी आहेत ते सेनेतील दोन बडे नेते! अनिल परब आणि रामदास कदम. दापोली नगरपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी अनिल परबांनी तीन विद्यमान पदाधिकाऱ्यांना नारळ देत नव्यांची निवड केली. दरम्यान, त्यांचा हा निर्णय म्हणजे रामदास कदम आणि त्यांचे पुत्र योगेश कदम यांना धक्का मानला जात आहे. कारण अनिल परब यांनी पक्ष शिस्तीचा भंग केल्याचं म्हणत उपजिल्हाप्रमुख सुधीर कालेकर, तालुका प्रमुख प्रदिप सुर्वे, शहर प्रमुख राजू पेटकर यांना नारळ दिला.  उपजिल्हा प्रमुख म्हणून राजू निगुडकर, विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून किशोर देसाई, तालुका प्रमुख म्हणून रुषिकेश गुजर आणि शहर प्रमुख म्हणून संदिप चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram