Ramdas Kadam : फडणवीसांनी फोन केले पण ठाकरेंनीच चर्चेचे दरवाजे बंद केले, रामदास कदमांचं वक्तव्य

Ramdas Kadam on Uddhav Thackeray: भाजप आणि शिवसेना युतीच्या चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना सतत फोन करत होते. मात्र काँग्रेससोबत (Congress) जाण्यासाठी उध्दव ठाकरे यांनीच चर्चेची सगळी दारं बंद केली. असा खळबळजनक दावा शिवसेनेचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी केला आहे.

उध्दव ठाकरे हे अमित शाह यांच्यासोबत बोलले असते तर  उध्दव ठाकरे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. मात्र अनेक फोन करूनही उध्दव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना प्रतिसाद दिला नाही. या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार असल्याचेही सांगत रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे. 

जिथे भारताचा झेंडा लावणं मुश्किल होतं तिथे भाजपने विजय मिळवला

मी कधीही राजकारण केलं नाही, चांगल्याला चांगलं बोललं पाहिजे, हीच माझी भूमिका राहिली आहे. मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना पायदळी तुडवून उध्दव ठाकरे हे काँग्रेस सोबत गेले. आज जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये जे निकाल आले यावर बोलताना रामदास कदम यांच्याकडून भाजपचे अभिनंदन करण्यात आले. जिथे भारताचा झेंडा लावणं मुश्किल होतं तिथे आज भाजपने विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाला आणि त्यांनी बघितलेल्या विकसित भारताच्या संकल्पानेला तिथल्या जानेतेने साथ दिली आहे. किंबहुना आगामी काळात असाच विजय आमचा देखील महाराष्ट्रात निश्चित असल्याचा विश्वासही रामदास कदम यांनी बोलताना व्यक्त केला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola