Ramdas Kadam On BJP : 100 + जागा द्या नाहीतर सर्व 288 जागा लढवू- रामदास कदम
Ramdas Kadam On BJP : 100 + जागा द्या नाहीतर सर्व 288 जागा लढवू- रामदास कदम
मुंबई: अजितदादांना जरा उशिरा घेतलं असतं तर त्यांच्या वाट्याला गेलेली 9 मंत्रिपदं शिवसेनेला मिळाली असती आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेल्यांना जॅकेट घालून बसावं लागलं नसतं असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटलंय. सर्व्हेच्या नावाखाली आमचे उमेदवार बदलले, पण भाजपचेही उमेदवार पडलेच की, त्यामुळे सर्व्हे फक्त शिवसेनेचे उमेदवार बदलण्यासाठीच होते की काय असा सवालही त्यांनी विचारला. विधानसभेच्या निवडणुकीत जर सेनेला 100 जागा दिल्या नाहीत तर सर्वच जागा आमच्या असं म्हणत त्यांनी भाजपला इशाराच दिला. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. काय म्हणाले रामदास कदम? जागावाटपावेळी जे झालं ते अतिशय घृणास्पद झालं. रायगड आमचं, रत्नागिरी आमचं, अमरावती आमचीच असं सगळं भाजपने केलं. अतिशय विश्वासाने आम्ही भाजपसोबत गेलो होतो. जर एकनाथ शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली असतील तर महायुतीच्या आणखी जागा वाढल्या असत्या. अमरावतीची जागा आमच्याकडून घेतली. त्या ठिकाणी अडसूळ आधी पडले होते ते ठीक. पण मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे दोनवेळा खासदार असतानाही ती जागा देवेंद्र फडणवीसांना जाहीर करावी लागली. त्यामुळे हा प्रकार पुन्हा न होता विधानसभेला आम्हाला 100 जागा द्या, म्हणजे आधी काम करता येईल.