Ramdas Kadam : Anil Parab यांचा गद्दार असा उल्लेख करत रामदास कदम यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

शिवसेनेपासून गेली काही वर्षे दुरावलेले ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी प्रथमच जाहीरपणे असंतोषाला वाट मोकळी करून दिली आणि थेट पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवरच जोरदार हल्लाबोल केला. विशेषतः परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांचा गद्दार असा उल्लेख करत कदम यांनी जोरदार हल्ला चढवला. परब यांनी पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधलाय आणि ते शिवसेनेलाच संपवायला निघालेत, असा खळबळजनक आरोप कदम यांनी केला. कदम यांनी मंत्री उदय सामंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावरही निशाणा साधला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram