Ramdas Athwale On Eknath Shinde : अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिंदेंची नाराजी स्वाभाविक- रामदास आठवले

Continues below advertisement

Ramdas Athwale On Eknath Shinde : अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर शिंदेंची नाराजी स्वाभाविक- रामदास आठवले

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एकनाथ शिंदे नाराज असणं हे स्वाभाविक आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिलेल्या शिंदेंना आता संधी मिळणार की नाही याची शंका असल्यामुळे शिंदेंची नाराजी आपण समजू शकतो. तसच ते कदाचित उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार नाहीत त्यामुळे एकनाथ शिंदेनी महायुतीचे संयोजक बनाव अशी प्रतिक्रिया आठवलेनी दिली आहे.

ही बातमी पण वाचा

Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर पोहोचलेली गाडी पोलिसांनी अडवली, विजय शिवतारे संतापून म्हणाले....

राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरु असताना पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे हे सोमवारी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना भेटण्यासाठी ठाण्यातील त्यांच्या बंगल्यावर गेले होते. यावेळी पोलिसांनी विजय शिवतारे Vijay Shivtare) यांना न ओळखल्यामुळे त्यांची गाडी अडवण्यात आली आहे. त्यामुळे विजय शिवतारे पोलिसांवर चांगलेच संतापले. 

प्राथमिक माहितीनुसार, विजय शिवतारे  एकनाथ शिंदे यांच्या बंगल्याच्या गेटमधून आतमध्ये शिरत असताना त्यांची गाडी पोलिसांकडून अडवण्यात आली. पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली. तुम्ही कोण, थांबा, असे पोलिसांनी म्हटले. त्यामुळे विजय शिवतारे हे चांगलेच वैतागले आणि त्यांनी पोलिसांना सुनावले. आमदार, माजी मंत्री ओळखता येत नाही का तुम्हाला ? बरोबर नाही, असे प्रत्येक वेळेस करतात तुम्ही, किती वर्षे झाले काम करत आहात?, अशा शब्दांत विजय शिवतारे यांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर विजय शिवतारे यांना एकनाथ शिंदेंच्या बंगल्याच्या गेटमधून आत सोडण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram