50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना-भाजपने सरकार बनवावं, फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावं : आठवले
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी एक वक्तव्य केलं आहे. भाजपशी युती झाल्यास शिवसेनेचाच फायदा होईल. 50-50 च्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेने भाजपसोबत सरकार बनवावं आणि मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांना द्यावं, असं रामदास आठवले म्हणाले. एबीपी माझाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
Continues below advertisement