Maharashtra Politics : ‘रोहित पवार बिनसलेले व्यक्तीमत्व, दररोज खोटं बोलतात’, Nilesh Ghaywal प्रकरणी राम शिंदेंचे टीकास्त्र
Continues below advertisement
पुण्यातील गुंड नीलेश घायवळ (Nilesh Ghaywal) प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असून, सभापती राम शिंदे (Ram Shinde) आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. 'रोहित पवार बिनसलेले व्यक्तीमत्व ते दररोज खोटं बोलण्याचं काम करतात,' असा घणाघात राम शिंदे यांनी केला आहे. घायबळला अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवारांनी पासपोर्ट दिल्याचा दावाही शिंदे यांनी केला. दुसरीकडे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात मनसेसह महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दस्त नोंदणीसाठीची क्षेत्रीय मर्यादा रद्द केल्याने आता राज्यात कुठेही मालमत्ता नोंदणी करता येणार आहे. तर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये ५० टक्के जागा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement