Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | ABP Majha
Continues below advertisement
राज्याच्या राजकारणात गाजत असलेल्या निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणावरून (Nilesh Ghaiwal Passport case) आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सभापती राम शिंदे (Ram Shinde) यांनी आमदार रोहित पवारांवर (Rohit Pawar) जोरदार टीका केली आहे. 'रोहित पवार हे बिनसलेले व्यक्तिमत्व असून ते दररोज खोटं बोलण्याचं काम करतात', असा घणाघाती हल्लाबोल शिंदे यांनी केला आहे. दुसरीकडे, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असून, नोव्हेंबरपासून दर वीस दिवसांच्या टप्प्यांत नगरपालिका, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. तर अजित पवार गटानेही युती आणि जागावाटपावर चर्चा करण्यासाठी जिल्हाध्यक्षांची बैठक बोलावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने खड्डे किंवा उघड्या मॅनहोलमुळे होणाऱ्या मृत्यूस सरकारला जबाबदार धरत सहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement