Rajyapal and Shiv Sena: राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात शिवसेना आक्रमक ABP Majha

Continues below advertisement

शिवसेनेनं राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत शिवसेनेनं आज मुंबई आणि नाशिकमध्ये आंदोलन केलं. समर्थ रामदासांशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांना कोण विचारतो, असं राज्यपालांनी म्हटलं होतं. त्यावरून वाद निर्माण झालाय. नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शालिमार परिसरात रास्ता रोको करण्यात आला. राज्यपाल चले जाव अशा घोषणा शिवसैनिकांनी यावेळी दिल्या. तर मुंबईत साकीनाका जंक्शन इथं शिवसैनिकांनी रस्ता रोखला. कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांनी निषेध केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram