Rajya Sabha Election 2024:राज्यसभेसाठी भाजपकडून 9 नावांची यादी समोर, दिल्लीला यादी पाठवल्याची माहिती
Continues below advertisement
Rajya Sabha Election 2024:राज्यसभेसाठी भाजपकडून 9 नावांची यादी समोर, दिल्लीला यादी पाठवल्याची माहिती
येत्या 27 फेब्रुवारीला रोजी राज्यसभेसाठी निवडणूक पार पडणार असून, यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. भाजपकडून राज्यसभेसाठी 9 उमेदवारांच्या नावाची यादी समोर येत असून, ती दिल्लीला पाठवण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातून भाजपकडून राज्यसभेसाठी कुणाला उमेदवारी मिळणार याचा अंतिम निर्णय दिल्लीत होणार आहे. भाजपकडून दिल्लीला पाठवण्यात आलेल्या यादीत नारायण राणे, विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकर, अमरीश पटेल, माधव भंडारी, चित्रा वाघ, हर्षवर्धन पाटील आणि संजय उपाध्याय यांचे नावं आहेत. त्यामुळे या नऊ नेत्यांपैकी कोणाच्या गळ्यात राज्यसभेच्या उमेदवारीची माळ पडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.
Continues below advertisement