Rajya Sabha Election 2022 : मविआच्या उमेदवाराला मतदान करण्याची विनंती केल्याचा MIM आमदाराचा दावा
राज्यसभेत आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवणाऱ्या शिवसेनेने मतांची जुळवाजुळव करण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षातील आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच शिवसेनेने मतांसाठी एमआयएमच्या आमदाराला गळ घातल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंत्री दादा भुसे यांनी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी एमआयएमचे मालेगावमधील आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांना विनंती केली आहे. दादा भुसे यांना पाठिंब्यासाठी आपली भेट घेतली होती, अशी माहिती मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी दिली आहे.