Raju Shetty : स्थलांतरित कामगारांचं आर्थिक आणि लैंगिक शोषणाची न्यायालयाकडून दखल

Continues below advertisement

अधिवक्ता प्रज्ञा तळेकर यांना त्यावर याचिका तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या स्थलांतरित कामगारांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण, ही बातमी मराठवाडा विभागातील दुष्काळग्रस्त भागातील स्थलांतरित कामगारांच्या दुर्दशेवर होती.  या कामगारांना पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, सोलापूर आणि अहमदनगर या राज्यातील साखरपट्ट्यात स्थलांतर करण्यास भाग पाडलं जातं. हंगामी सरन्यायाधीश एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांनी हा लेख त्रासदायक असल्याचं आठ मार्च रोजी म्हटलं होतं. त्यांनी बीड, धाराशिव, जालना, लातूर, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतील ५०० गावांपैकी सुमारे ७० टक्के गावं ही दर हिवाळ्यात रिकामी होतात याचीही नोंद घेतली होती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram