Milk Price | राजू शेट्टी यांचे दूध दराचे आंदोलन म्हणजे, मॅच फिक्सिंगसारखे दूध फिक्सिंग : सदाभाऊ खोत
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दर मागणीसाठी 21 जुलै रोजी राज्यभर दूध बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर राजू शेट्टींच्या या दूध आंदोलनावरून रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजु शेट्टींवर जोरदार निशाणा साधला आहे.
राजू शेट्टी यांचे आंदोलन म्हणजे, नाटक असून, हे दूध आंदोलन मॅच फिक्सिंग असल्याची टीका माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तसेच बारामतीला आमदार होण्यासाठी जातात, पण दुधाच्या दरासाठी जाणे जमत नाही, असा टोलाही खोत यांनी राजू शेट्टींनी लगावला आहे. ते सांगली मध्ये बोलत होते.
Continues below advertisement