Raju Shetti : पवारांनी अनियमितता केली नसेल तर डर कशाला?; राजू शेट्टींची प्रतिक्रिया

Continues below advertisement
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने याला राजकीय हेतूने प्रेरित म्हटले आहे. शेट्टींच्या मते, 'मोठी अनियमितता पण आहे यामध्ये निश्चितच अनियमितता आहे.' त्यांनी पुढे म्हटले की, जर पवार कुटुंबियांनी काही चुकीचे केले नसेल, तर त्यांना घाबरण्याचे कारण नाही. शेट्टी यांनी संस्थेच्या रचनेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत; जिथे साखर कारखानदारच विश्वस्त आहेत आणि संस्थेतील शास्त्रज्ञ त्यांचे नोकर आहेत. अशा परिस्थितीत, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या हिताचा अहवाल कसा देतील, असा सवाल त्यांनी विचारला आहे. ही चौकशी झालीच पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola