Raju Shetti यांचा महाविकास आघाडीला राम राम? भाजपचे नेते शेट्टींच्या भेटीला

महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी आतापर्यंत राज्य सरकारवर अनेकवेळा टीका केलीय... मात्र आता राजू शेट्टींनी चक्क महाविकास आघाडीला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिलेत.  महाविकास आघाडीनं सर्वच पातळीवर निराशा केल्याचं राजू शेट्टी म्हणालेत... एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत शेट्टींनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीय. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून, महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचं राजू शेट्टी म्हणालेत.. दरम्यान भाजपच्या काळातील सर्वच योजना नावं ठेवण्यासारख्या नव्हत्या असं सूचक वक्तव्य शेट्टींनी केलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola