Raju Shetti on Sugarcane : जिथे चांगला दर मिळेल तिथे ऊस विकणार, राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Continues below advertisement

आता राज्याबाहेर ऊस नेण्यास यंदा राज्य सरकारने बंदी घातली आहे. याचेच आदेश अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी काढलेत. यंदाच्या हंगामात राज्यात उसाचं पिक हे खूप कमी आहे.  त्यामुळे गळीत हंगाम जेमतेम अडीच ते तीन महिने सुरू राहील असा अंदाज व्यक्त केला जातोय.. म्हणूनच सरकारने राज्याबाहेरील कारखान्यांना ऊस देण्यास बंदी घातली आहे... राज्यातील साखर उद्योग पूर्ण क्षमतेने सुरू राहावा यासाठी सहकार कायद्यातील ऊस नियंत्रण तरतुदीनुसार ही बंदी घातली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.. चांगला दर मिळेल तिथे आम्ही ऊस देणार, आम्हाला अडवून दाखवा असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram