Nagpur : राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील छापेमारी प्रकरणी इश्वरलाल जैन यांचे कुटुंबीय चौकशीसाठी हजर

Continues below advertisement


जळगावच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सवरील ईडीच्या छापेमारीत आणखी एक महत्त्वाची बाब उजेडात आलीये. आमदार मनीष जैन यांच्या मालकीच्या राजमल लखीचंद आणि मानराज नावाने असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांनी बँकांकडून कर्ज घेताना १ हजार २८४ किलो दागिन्यांचा माल नजर गहाण ठेवला होता. ईडीनं कसून तपास केल्यावर ही बाब समोर आली. प्रत्यक्षात त्यांच्याकडे ३९.३३ किलो वजनाचे दागिने आढळून आलेत. त्यातही तीन आरोपींच्या कंपन्यांमधील माल साठा २०२२-२३ या आर्थिक वर्षात शून्य दाखवल्याचा गंभीर आरोप ईडीनं केला होता. शिवाय मोबाइल फोनमध्ये विदेशी गुंतवणुकीसंदर्भात संशयास्पद कागदपत्रे आढळल्याचे नमूद करण्यात आलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram