Rajkot fort Shivaji Maharaj Statue : 'मालवणमधील घटनेला महाराष्ट्राचं ढिसाळ प्रशासन जबाबदार'

मालवणमधील राजकोट किल्ल्यावर (Malvan Rajkot)  100 कोटी रुपये खर्चून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या संदर्भात  मुख्यमंत्र्यांपुढे, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांच्या खात्याकडून प्रेझेंटेशन सादर करण्यात आले आहे.  शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह  100 कोटी खर्चून ही शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.  या शिवसृष्टीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतरिम मंजूरी देणार असल्याची माहिती आहे.  यामध्ये शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास इतिहासप्रेमींना पाहता येणार आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमी भावना संतप्त होत्या. 26 ऑगस्टला ही घटना घडल्यानंतर आता तब्बल एका महिन्याच्या आत राज्य सरकारने मालवण मधील राजकोट किल्ल्यावर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूट उंच तलवारधारी पुतळा उभारणार आहे. तसेच या पुतळ्याजवळ शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे.  तसंच त्याठिकाणी फिश अॅक्वेरिअम आणि म्युझियमही असणार  आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola