Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेत
Rajkiya Shole Walmik Karad : वाल्मिक कराडची हजार कोटींचे मालक? ज्योती जाधवांची प्रॉपर्टी चर्चेत
सध्या बीड जिल्हा संपूर्ण महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे. येथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. या हत्या प्रकरणी कराडला सध्या सात दिवसांची एसआयटी कोठडी देण्यात आली आहे. एकीकडे वाल्मिक कराड याच्या अडचणी वाढत असताना आता दुसरीकडे त्याच्या संपत्तीचीही सगळीकडे चर्चा होत आहे. याआधी वाल्मिक कराडचा पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीत 4 बीएचके फ्लॅट असल्याचे समोर आले होते. आता याच वाल्मिक कराडचा पुण्यात असाच एक आलिशान फ्लॅट असल्याचे उघड झाले आहे. याबाबतची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे.
एक कोटीचा फ्लॅट
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे असलेला आलिशान फ्लॅट सील करण्याची प्रक्रिया पिंपरी चिंचवड पालिकडेकडून सुरु आहे. असं असतानाच वाल्मिक कराडचा आणखी एक फ्लॅट असल्याचं समोर आलंय. हा फ्लॅट पत्नी मंजली वाल्मिक कराड यांच्या नावावर आहे. पिंक सिटी रोडवरील मि कासा बेला सोसायटीतील 403 नंबरचा हा फ्लॅट आहे. फ्लॅटवर वाल्मिक कराडचे नाव आहे. 1 एप्रिल 2016 पासून हा फ्लॅट अंजली कराड यांच्या नावे असल्याची नोंद पिंपरी पालिकेच्या करसंकलन विभागाकडे आहे. आजच्या बाजारभवानुसार हा फ्लॅट एक कोटींचा आहे. एक कोटींचा हा फ्लॅटदेखील तेवढाच आलिशान असल्याचं बोललं जातंय.