Rajkiya Shole : दोन पक्ष, दोन दिवाळी.... संपली खेळीमेळी : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Continues below advertisement

Rajkiya Shole : दोन पक्ष, दोन दिवाळी.... संपली खेळीमेळी : 1 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

हेही वाचा : 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी आज भाष्य करताना अप्रत्यक्षपणे शिंदे गटाच्या नेत्या  शायना एनसी (Shaina NC) यांचा 'इम्पोर्टेड माल' असा उल्लेख केल्यानंतर गदारोळ सुरु झाला आहे. शायना एनसी यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शायना एनसी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआर नोंदवण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचा उल्लेख महाविनाश आघाडी करत शायना एनसी यांनी जोरदार हल्लाबोल केला.  शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा मात्र, तक्रार दाखल करून शायना एनसी पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटात राडा झाल्याचे बघायला मिळाले आहे. यावेळी शायना एनसीच्या समर्थनार्थ जमलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये थेट धक्काबुक्की झाली आहे. मिळालेल्या महितीनुसार शिंदेंच्या शिवसेनेच्या दोन गटातच हा राडा झाला आहे. शायना एनसी यांच्या समर्थनार्थ नागपाडा पोलिस स्थानकात आलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्येच वाद झाला आणि तो विकोपला जात नागपाडा पोलीस स्टेशनच्या आवारात धक्काबुक्की झाल्याची माहिती आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram