ABP News

Rajkiy Sholey Nana Patole| ऑफर भारी, मविआ-2 ची तयारी? पटोलेंची शिंदे-अजितदादांना ऑफर Special Report

Continues below advertisement

धुळवडीच्या रंगात नाना पटोलेंनी स्वप्नांचा रंग भरलाय..  एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना नानाभाऊंनी दिवसा मुख्यमंत्रीपदाची स्वप्न दाखवलीयत.. धुळवडीच्या रंगांचा आणि थंडाईचा असर वाढण्यापूर्वी म्हणजे सकाळी सकाळी नानाभाऊंनी एकनाथ भाई आणि अजितदादांना एक अफलातून ऑफर दिली.. भाजपला बाजूला सारुन मविआ-२ अस्तित्वात आणण्याची क्षमता असलेली नानाभाऊंची ही धमाल ऑफर आहे  तरी काय? पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट

 




होळी, धुळवड म्हंटलं की धमाल आलीच..
बुरो न मानो होली है म्हणत जे एरवी बोलणं शक्य नाही ते बोलून घ्यायची सोयसुद्धा या सणात असते..
काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी या स्कीमचा फायदा घेत धुळवडीला धमाल उडवून दिली..
त्यांनी एक अफलातून ऑफर दिलीय...
दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नाही तर थेट
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना..
महाराष्ट्र वाचवण्यासाठी काँग्रेससोबत या अशी ऑफर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नानांनी दिली आहे..
नाना एवढ्यावरच थांबले नाहीत तर दोघांचंही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पूर्ण होईल असं गाजरही धुळवडीच्या मुहुर्तावर दाखवलं आहे.
बुरा न मानो होली है असं म्हणायलाही ते विसरले नाहीत.



रंगांची उधळण होत असताना असे कानाला गोड वाटणारे शब्द ऐकून एकनाथ शिंदेंना काय वाटलं असेल हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या २-३ वर्षात राजकारणाची आणि नशीबाची सापशिडी कसं काम करते हे जवळून अनुभवल्याने एकनाथ शिंदेंनी नानाची ऑफर ऐकून न ऐकल्यासारखी केली.. आणि बुरा न मानो होली है असं सांगायलाही ते विसरले नाहीत

((बुराना मानो होळी हे.. भगवा रंग ज्यांना आवडेल त्यांनी सोबत यावं
भगवा हा संतांचा रंग ,हिंदुत्वाचा रंग आहे त्यामुळे तो कोणालाही बदलता येणार नाही जो तो बदलतील त्याला परिणाम भोगवेच लागतात ..हा रंग कोणाचाही द्वेष करत नाही
ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगात नाहून निघावं आणि सोबत यावं अश्या प्रकारच्या शुभेच्छा देतो..))


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नानांची ऑफर महायुतीचे नेते स्वीकारणार नाहीत असा विश्वास व्यक्त केली. आणि जाता जाता नांना एक सल्लासुद्धा देऊन टाकला...



लक्षवेधीसंबंधित परिणय फुकेंच्या गंभीर आरोपांमुळे गेले दोन दिवस नाना पटोलेंचं नाव चर्चेत आहे, त्यात आजचा धुळवडीचा म्हणजे मजामस्तीचा दिवस.. अशा पार्श्वभूमीवर नानांची ऑफर कितपत गांभीर्याने घ्यायची हा प्रश्न सुद्धा आहेच. काँग्रेसचे स्वत:चे फक्त १६ आणि मविआकडे फक्त ४६ आमदार आहेत.. तरीही नाना पटोलेंनी दिलेली धमाल ऑफर भाई-दादांनी स्वीकारली आणि मविआ-१ प्रमाणे भाजपला दूर ठेवून बहुमताची जुळणी केलीच तर मविआ-२ ची आकडेवारी कशी असेल त्यावर एक नजर टाकुयात

नाना पटोले आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाहीत त्यामुळे त्यांच्या या ऑफरला तसा अर्थ नाही.. नानांनी दिलेली ऑफर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना कितपत मान्य असेल ही सुद्धा मोठी शंका आहे.. त्यात महाशक्तीच्या सामर्थ्याची जाणीव शिंदे आणि दादा दोघांनाही आहे त्यामुळे अशा ऑफरचा सध्या तरी गांभीर्याने विचार करतील याची शक्यता कमीच आहे.
धुळवडीच्या निमित्ताने नानांनी साखर पेरणी तर करुन ठेवलीय.. त्यामुळे आत्ता झाला नाही तरी
महाविकास आघाडी-२ चा प्रयोग भविष्यात कधी होणार नाहीच असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.. बुरा न मानो होली है
ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram