Rajiv Khandekar : एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकरांना सह्याद्री जीवनगौरव पुरस्कारानं गौरव

Continues below advertisement

राष्ट्र प्रथम वंदे मातरम ह्या ब्रीद वाक्याने चालणारी हिंदवी परिवार ही संघटना गेल्या २ दशकांपासून युवकांसाठी गडकोट पदभ्रमंती मोहिम आखते. छत्रपती शिवरायांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचा थरार महाराष्ट्रातील शिवभक्तांना अनुभवता यावा डॉ शिवरत्न शेटे यांच्या नेतृत्वाखाली 9 डिसेंबर ते 13 डिसेंबर या चार दिवसांत पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी  छत्रपती व्यंकोजीराजे यांचे 14 वे वंशज आबाजी राजे भोसले आणि राणीसाहेबांना विशेष मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसंच एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना सह्याद्री जीवनगौरव पुरस्कारानं गौरवान्वित करण्यात आलं. सोबतच दैनिक नवशक्तीचे समुह संपादक राजा माने, राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड, वेल्लोर येथील सामाजिक कार्यकर्ते बळवंत जगदाळे, जिल्हाधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनाही सह्याद्री जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. त्यासोबतच चित्रकार नितीन खिलारे, वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे, डॉ. नयना बच्चू कडू यांना सह्याद्रीभूषण पुरस्काराने गौरवलं गेल, तर गडकन्या हमीदाखान यांना सह्याद्रीभ्रमंतीभूषण आणि डॉ. यशवंत राजे भोसले यांना सह्याद्रीशौर्य पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरण करण्यात आलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram