RT PCR Covid Testing Kits | राज्यात साडेबारा लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित : आरोग्यमंत्री
Continues below advertisement
राज्यात कोरोनाच्या चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. थोड्याथोडक्या नाही तर आरटी पीसीआरच्या तब्बल 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.
या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येते. सदोष किट्स वितरित करणाऱ्या GCC Biotech ltd कंपनी ला काळ्या यादीत टाकण्याची आवश्यकता असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी अधोरेखित केलं. तसंच GCC Biotech Ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला असून सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.
Continues below advertisement