Rajesh Tope on Corona : मार्च महिन्यातल्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट : राजेश टोपे : ABP Majha
गेले दोन वर्षांपासून आपल्या मानगुटीवर बसून आपल्याला घरात डांबून ठेवणारा कोरोना कधी संपणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. या प्रश्नाचं उत्तर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलंय. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचा शेवट होणार असून दर आठवड्यातला आता निर्बंध टप्प्या टप्य्याने कमी होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय. तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार असल्याचं तज्ज्ञांचं मत असल्यानं आता राज्यातही निर्बंध कमी करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.