सोलापूरच्या उपमहापौरांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिले; पोलिसांची भूमिका संशयास्पद
सोलापूरचा उपमहापौर राजेश काळे यांना अटक करण्यापूर्वीच सोडून दिल्याने पिंपरी चिंचवड पोलिसांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळे यांना ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळे यांना कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळेला नोटीस देऊन सोडण्यात आले. पण खरंच काळे यांना ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. काळेंना शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळे यांनी पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळे यांनी हा बहाणा केल्याचं बोललं जातंय.