Rajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट

Continues below advertisement

Rajesaheb Deshmukh  : बीडचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुखांनी घेतली शरद पवारांची भेट 
परळी विधानसभा मतदारसंघाचे अनुषंगाने आज पवार साहेबांसोबत चर्चा झाली. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत काँग्रेसला ही जागा मिळावी अशी आम्हाला अपेक्षा राहील. पवार साहेब मोठ्या मनाचे आहेत याबाबत विचार करतील   बीड जिल्ह्याचें पालकमंत्री धनंजय मुंडे भ्रष्टाचारी आहेत. त्यांनी बजाज अलायन्स नावाची पिक विम्याच्या अनुषंगाने कंपनी आणली मात्र एकालाही पीक विमा दिला नाही बीड जिल्ह्यात हजारो शेतकरी आहेत विचार करा किती कोटींचा हा भ्रष्टाचार असेल  भ्रष्टाचाराची रक्कम कुठे जाते हे तुम्ही पाहिला असेल काल परवा रश्मिका मानधना या अभिनेत्रीला परळीमध्ये आणला यांनी तब्बल 2 कोटी रुपये त्या अभिनेत्रीला दिले काय गरज होती? एकीकडे पूर परिस्थिती आणि दुसरीकडे नाच गाण्याचा कार्यक्रम  यांनी हेमामालिनीला देखील आणलं हेमा मालिनी स्टेजवरून म्हणाल्या अरे इथं गर्दी नाही असं कसं काय? मुळात यांनी केलेला भ्रष्टाचार इतका आहे की कोण यांना बघायला जाईल जर अभिनेत्रीला पाहायला गेले असते तर ठीक होतं मात्र हेच भ्रष्टाचारी लोक तिथे असतील तर जनता त्यांना माफ करणार नाही  बीड जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत देखील आम्ही काम केला आहे त्यांनी कधीही जातिवाद केला नाही मात्र धनंजय मुंडे प्रचंड जातीवादी आहेत सध्या बीड जिल्ह्यात जो जातिवाद निर्माण झाला आहे याला सर्वस्वी ते जबाबदार आहेत याचे उदाहरण पाहायला गेलं तर काही दिवसांपूर्वी यांनी लक्ष्मण हाकेलां आणून बसवलं होतं वडीबुद्रुक येथे जे आंदोलन केलं त्याला सर्वस्वी पाठिंबा हा धनंजय मुंडे यांचाच होता अशा प्रकारचा जातीवाद बीड जिल्ह्यात पाहिलेला नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram