Gautami Patil : 'गौतमी 'पाटलांची' बदनामी करतेय' , मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटीलांचा इशारा
गौतमी पाटील आणि वाद हे आता समीकरणच झालंय.. कधी तिच्या नृत्याच्या प्रकारावरून तर कधी लावणीला बदनाम केल्याच्या आरोपावरून गौतमीवर टीका केली जाते..हीच गौतमी पुन्हा एकदा वादात अडकलीये...आणि या नव्या वादाचं कारण आहे तिने लावलेलं पाटील हे आडनाव..पुण्यात गौतमी पाटीलच्या आडनावावरून नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीत गौतमीचे आडनाव पाटील नसल्याचा दावा करण्यात आला आहे. 'गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. त्यामुळे तिने पाटील आडनाव लावून पाटील आडनावाची बदनामी करु नये...अन्यथा महाराष्ट्रात तिचे कार्यक्रम होऊ देणार नाही' असा थेट इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी दिला आहे. त्यामुळे आता गौतमी पाटीलच्या आडनावरून नवा वाद उभा राहिला आहे.