Raje Samarjeetsinh Ghatge Special Interview : भाजपमधून एक्झिट, हातात तुतारी; घाटगेंची स्फोटक मुलाखत


आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांनी त्यांना मुलासारखे प्रेम दिले तर सुप्रियाताई मोठ्या भावाप्रमाणे राखी बांधायच्या...ईडीपासून सुटका आणि आयुष्यभर न मिळालेल्या पालक मंत्री पदाच्या तुकड्यासाठी त्यांनी या कौटुंबिक नात्याचा सौदा केला. त्यामुळे त्यांना आता झोप येत नसल्यामुळे वैफल्यग्रस्त झाल्याने त्यांच्याकडून चुकीची वक्तव्य येत आहेत.अशी बोचरी टिका शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर  नाव न घेता केली. कागल येथे लाभार्थ्यांना शासकीय योजनांच्या मंजुरी पत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमावेळी ते बोलत होते. घाटगे पुढे म्हणाले, काही दिवसापूर्वी जी काही चुकीचे वक्तव्य केले गेले.जे शब्द वापरले गेले त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी ते शब्द का वापरले गेले यावर जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे...असंही समरजित घाटगे म्हणाले आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola