Ashok Gehlot On Maharashtra Government | महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु : अशोक गहलोत

Continues below advertisement

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा गौप्यस्फोट राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला आहे. तसेच राजस्थानमधील सरकार पाडण्यासाठी भाजप कारस्थान रचत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. एवढचं नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह राजस्थानमधील काँग्रेस नेत्यांना भेटल्याचा दावाही अशोक गहलोत यांनी केलाय. देशात पाच सरकारं पाडली असून राजलस्थान सरकारही पाडणार, असं भाजपच्या वतीने काँग्रेस आमदारांना सांगण्यात आल्याचंही अशोक गहलोत म्हणाले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दावा केला आहे की, भाजपने सांगितलं होतं की, हे पाडण्यात येणारं सहावं सरकार असेल. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शनिवारी बोलताना दावा केला आहे की, त्यांच्या राज्यासोबतच महाराष्ट्रातील सरकारही पाडण्याचा प्रयत्न सुरु आहे. गहलोत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांना आरोप केला आहे की, काँग्रेसच्या काही आमदारांसोबत अमित शाह यांनी एक बैठक घेतली होती. राजस्थानमधील विरोधी पक्ष आणि भाजप नेते गुलाब चंद्र कटारिया यांनी या आरोपांवर पलटवार केला आहे. कटारिया यांनी सांगितलं की, 'काँग्रेसने जर त्यांच्या पक्षात शांतता राखली तर ते उत्तम पद्धतीने सरकार चालवू शकतील.'

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram