Rajasthan Chief Minister : राजस्थानच्या मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात? 'ही' दोन नावं चर्चेत
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 04:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी कोण असणार याचा निर्णय थोड्य़ाच वेळात जाहीर होणार आहे. मात्र, वसुंधरा राजे शिंदे यांचं नाव रेसमध्ये सर्वात पुढे असल्याचं कळतंय. काही वेळापूर्वी राजस्थानचे प्रभारी म्हणून केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि विनोद तावडे जयपूरमध्ये दाखल झाले. वसुंधरा आणि राजनाथ यांच्यात १५ ते २० मिनिटं चर्चा झाली. चर्चा झाल्यावर दोघंही एकाच गाडीत बसून भाजप कार्यालयाकडे रवाना झाले. यावेळी वसुंधरा यांच्या चेहऱ्यावर हसू होते. त्यामुळे निर्णय त्यांच्या बाजूनं झाला आहे की काय, अशा चर्चा लगेच सुरू झाल्या.