Rajan Salavi On Uday Samant : राजन साळवींचं उदय सामंतांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान

Continues below advertisement

कोकणात ठाकरेंच्या शिलेदाराचं एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांला थेट राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान   राजापूर तालुक्यातील रुग्णालय उभारणीच्या मुद्द्यावरून राजन साळवी आणि उदय सामंत आमने - सामने   रुग्णालयाच्या उभारणीसाठी पाठपुरावा केल्याचं उदय सामंत यांनी सिद्ध करावं अन्यथा राजकीत संन्यास घ्यावा, मी पाठपुरावा केल्याचं सिद्ध न केल्यास मी स्वतः राजकीय संन्यास घेईन - राजन साळवी   सामंत यांच्या मतदार संघातील जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्तेकडे सामंत यांनी लक्ष द्यावं; राजन साळवींची टीका   रुग्णालयासाठी लागणारी जमीन मिळवण्यापासून ते मंजुरीपर्यंत पाठपुरावा केल्याचं मी कागदपत्रांसह सिद्ध करेन, अन्यथा राजकीय संन्यास घेईन  - राजन साळवी  राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावी मुंबई  - गोवाहायवे लगत उभारले जाणार आहे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल   कोकणात आता ठाकरे आणि शिंदे यांचे शिलेदार आमने-सामने ठाकले आहेत. यावेळी राजापूर तालुक्यातील  सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी थेट उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना राजकीय संन्यास घेण्याचं आव्हान दिलं आहे. राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावी मुंबई गोवा हायवे लगत सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली जाणार आहे. दरम्यान या हॉस्पिटलची उभारणी होण्यासाठी सुरुवातीला लागणारा काही निधी उपलब्ध करून देत असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली. त्यानंतर राजन साळवी यांनी उदय सामंत यांना थेट आव्हान दिलं आहे. राजापूर - लांजा - साखरपा या विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून या रुग्णालयासाठी मी पाठपुरावा केला. त्याची कागदपत्र देखील माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण असं असताना देखील उदय सामंत त्याचं श्रेय घेऊ पाहत आहेत. त्यांचे थोरले बंधू किरण सामंत यांनी पाठपुरावा केल्याचं सांगत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रयत्न केल्याचं देखील म्हणणं उदय सामंत यांचा आहे. पण उदय सामंत यांनी या रुग्णालयासाठी पाठपुरावा केल्याचं सिद्ध करावं. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी आणि जमीन मिळवण्यासाठी मी पाठपुरावा केल्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. दरम्यान त्यांनी हे सिद्ध न केल्यास राजकीय संन्यास घ्यावा अन्यथा मी राजकीय संन्यास घेईन असं थेट आव्हान साळवी यांनी उदय सामंत यांना दिले आहे. त्याचवेळी त्यांनी उदय सामंत यांच्या मतदारसंघात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या दुरावस्तेकडे  लक्ष द्यावे. त्या ठिकाणी डॉक्टर्स नसणे, रुग्णांचे होणारे हाल याबाबत लक्ष घालावे अशी टीका करत उदय सामंत यांना पालकमंत्री म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या अवस्थेबाबत चिमटे देखील साळवी यांनी काढले आहेत. राजापूर तालुक्यामध्ये चांगलं रुग्णालय उभा राहिल्यास त्याचा फायदा हा रुग्णांना होणार आहे. त्याचं राजकारण करण्यात काही अर्थ नाही. पण त्याचं उगाच श्रेय सामंत यांनी घेऊ नये असं थेट आव्हान साळवी यांनी केले आहे. त्यामुळे आता रुग्णालय उभारणीचा श्रेय वाद उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारांमध्ये रंगला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram