ABP News

Raj Thackrey Ganpati : राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन

Continues below advertisement

Raj Thackrey Ganpati : राज ठाकरेंच्या घरी बाप्पाचं जल्लोषात आगमन

आज सर्वत्र गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. देशभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह पाहयला मिळत आहे. दरम्यान, आजची गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) व्यावसायिकांसाठी एक उत्तम पर्वणी असणार आहे. कारण गणेश चतुर्थीनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. आजच्या दिवशी मोठा व्यवसाय होणार आहे.  CAT च्या अंदाजानुसार, यावर्षी गणेश चतुर्थीला देशभरात सुमारे 25,000 कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे.

अहवालत दिलेल्या माहितीनुसार यावेळी देशभरात 20 लाख गणेश मंडळे उभारण्यात आली आहेत. ज्यातून 25000 कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गणेश चतुर्थीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि गोवा यासारख्या भागात आर्थिक उलाढाल वाढते. या राज्यांमधील स्थानिक व्यावसायिकांनी केलेल्या सर्वेक्षणानंतर 20 लाखांहून अधिक गणेश मंडळे उभारण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्येक मंडळावर किमान 50,000 रुपये खर्चाचाही विचार केला, तर हा आकडा 10,000 कोटींहून अधिक होतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram