Raj Thackeray : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे सभा घेणार

Continues below advertisement
Raj Thackeray : कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरे सभा घेणार
राज ठाकरे हे कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार सभा घेणार आहेत. सभा कधी घ्यायचे याचा निर्णय राज ठाकरे घेतील. आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार नरेश म्हस्के तसंच भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांना सभा घेण्याचं साकडं घातलं. राज यांनीही सभा घेणार असल्याचं मान्य केल्याचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलंय.   राज ठाकरेंच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram