Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार

Continues below advertisement

Raj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दार

हेही वाचा : 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपुर्वी एक मोठं वक्तव्य केलं होतं. मी आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ नये, यासाठी अनेक लोक प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये आतले आणि बाहेरचे अशा सगळ्यांचा समावेश आहे, असे वक्तव्य मनसेप्रमुख (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. अशातच आता निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरेंनी एबीपी माझाला मुलाखत दिली यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray) किंवा मनसेसोबत जाणार का या प्रश्नावर रोखठोक उत्तर दिलं आहे.  दोन्ही ठाकरे (Thackeray) बंधू एकत्र येणार का या  याकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. या प्रश्नाचे उत्तर एबीपी माझाला दिलेल्या मुलाखती वेळी उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. महाराष्ट्र द्रोह्यांसोबत जाणार नाही असा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर यावेळी बोलताना त्यांनी मनसेचा उल्लेख गुनसे असा केला आहे.   नेमकं काय म्हणाले उध्दव ठाकरे? दोन ठाकरेंनी एकत्र यावं असं महाराष्ट्रातील जनतेला वाटतं वैयक्तिक कौटुंबिक मुद्दे काही मुद्दे आहेत काही वेळेला इगो चा विषय आहे त्यामुळे ते होऊ शकत नाही का किंवा तुमचं स्वतंत्र नातं नसतं तर तुम्ही एकत्र आला असतात का? या प्रश्नावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले असं नाही. मी जसा तुम्हाला मुख्यमंत्री पदाबद्दल सांगितलं महाराष्ट्राचे लुटारू नकोत बरोबर आहे, त्यांनी ते जाहीर केलेला आहे. कोण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, मग जर तो महाराष्ट्राचा लुटारू मुख्यमंत्री होणार असेल आणि त्यांचा पाठिंबा त्याला असेल तर माझी त्यांच्याशी युती होऊ शकत नाही. एक तर मी माझं धोरण स्पष्ट केले आहे. तसं त्यांनी देखील त्यांचा धोरण स्पष्ट करावं. हे पाहिलं पक्षाचा नेमकं नाव काय आहे, मनसे आहे का गुण असे आहे ते त्यांनी ठरवावे असं एक उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram