Raj ThackerayTweet : बाळासाहेबांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह नको, मनसेकडून राज ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट
Raj ThackerayTweet : बाळासाहेबांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह नको, मनसेकडून राज ठाकरेंचा व्हिडिओ ट्विट
बाबरी मशीदीबाबत उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. बाबरी मशीद पाडण्याचा प्लॅन सेनाभवनमध्ये झाला हे म्हणणं चुकीचं आहे. बाबरी मशीद पाडकामाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केलं होतं असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल वादग्रस्त दावा केला. या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद चंद्राकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच त्या दिवशी घडलेला प्रसंग देखील त्यांनी या वेळी सांगितला. हाच प्रसंग सांगणारा व्हिडीओ राज ठाकरे यांनी पुन्हा शेअर करत दुजोरा दिला आहे.