Raj Thackeray Vidarbha Visit :राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी;मनसेची मागणी
Raj Thackeray Vidarbha Visit :राज ठाकरेंच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेची विशेष काळजी घ्यावी;मनसेची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक आठवड्याच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत...या निमित्य सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात यावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आलीये. राज ठाकरेंच्या दौऱ्यात मराठवाड्यासारखे निषेधाचे काही प्रकार घडले तर आम्ही विरोधकांना जशास तसे उत्तर देऊन असा इशाराही मनसैनिकांनी दिला आहे . कायदा सुव्यवस्थेचा काही प्रकार घडला तर याला पूर्णतः पोलीस यंत्रणा जबाबदार असेल असं निवेदनात नमूद केलंय.. मनसेकडून नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना हे निवेदन देण्यात आलंय.. दरम्यान यासंदर्भात जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांनी काय प्रतिक्रिया दिलीेय पाहूयात मनसेच्या वतीने नागपूरचे पोपोलीस आयुक्तांना सांगण्यात आले. राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा 23 आगस्टला गोंदिया येथून सुरु होत आहे. 24 आगस्टला चंद्रपूर, 25 आगस्ट राखीव, 26 आगस्ट यवतमाळ, 27 आगस्ट नागपूर, 28 आगस्ट अकोला व 29 आगस्टला बुलढाणा जिल्हा असा राज ठाकरे यांचा नियोजित दौरा आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेला घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांची काय मागणी आहे या संदर्भात जिल्हाध्यक्ष आदित्य दुरूगकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी