Raj Thackeray Uncut Speech | घुसखोरांची साफसफाई आता झालीच पाहिजे : राज ठाकरे
Continues below advertisement
आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. इथून पुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, अशा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आज दिवसभर मनसेच्या मोर्चाने लक्ष वेधले असताना राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल केला. सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.
Continues below advertisement