Raj Thackeray UNCUT : बहुसदस्यीय प्रभाग, ईडी, अनिल देशमुख, खड्ड्यांवरून राज ठाकरेंची सरकारवर टीका

Continues below advertisement

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. आज राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीवरुन सरकारवर ताशेरे ओढलेत. सत्ताधाऱ्यांच्या सोयीचा हा मुद्दा आहे आणि म्हणून तिथे सोयीनुसार, सत्ता स्थाप करण्यासाठी, विजय मिळवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला गेला असं ते म्हणाले. तसेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरी ईडी कारवाईबाबतही राज ठाकरेंनी भाष्य केलंय.  'ते' गृहमंत्री ईडीला 'वेडे' समजलेत बहुदा, असं म्हणत राज ठाकरेंनी उपरोधिक टोला लगावला आहे. 

 

बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "प्रभागांची तोडफोड करुन आपल्याला हवे तसे प्रभाग करणं योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन तीन बोटं का दाबायची? निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी." पुढे बोलताना "कायदे वेगवेगळे का? 2, 3, 4 प्रभाग हा खेळ कसला? उद्या 2-2 आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहात का? ग्राम पंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग का नाही, महापालिकेलाच प्रभाग का? सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबवूच, पण आता जनतेनं विरोध करावा, कोर्टात जावं, निवडणूक आयोगाकडे जावं.", असंआवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram