Raj Thackeray Full PC :निवडणूक प्रक्रियेत शिक्षकांवर जबाबदारी, राज ठाकरेंवरुन निवडणूक आयोगावर निशाणा

Continues below advertisement

Raj Thackeray Full PC : शिक्षकांना निवडणुकीच्या कामात (Teachers Election Duty) जुंपण्यावरुन मनसे (MNS) पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आक्रमक झाले आहेत. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करा. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले. 

राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल

निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram