Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
आचरेकर सरांनी जेवढे खेळाडू तयार केले, तेवढे इतर कुठल्या कोचने केले असतील असे मला वाटत नाही ... मला विद्यार्थी भेटायला येतात, त्यातील एकही जण बोलत नाही की मला शिक्षक व्हायला पाहीजे ज्या देशात मुलांना शिक्षक व्हावे वाटत नाही आपल्याकडे गुरूंना तितकसं महत्त्व दिलं गेलेलं नाही सचिन दरवर्षी गुरूपौर्णिमेला सरांचा आशिर्वाद घ्यायला यायचा हल्ली लोकं फक्त मोबाईलवर एसएमएस पाठवतात, आपली गुरूपौर्णिमा तितकीच उरलीय आमच्याकडे गुरुपौर्णिमा मोबाईलवर होते आचरेकर सरांचेा मला पुतळा नको होता..म्हणून असे स्मारक सरांचं इथं स्मारक व्हावं अशी माझी इच्छा होती, त्यांचा पुतळा नको होता, म्हणून हे वेगळं स्मारक केलं आज क्रिकेटही बदललं, सगळ्या गोष्टी आल्या पण आजही लोक बोलतात की मला सचिनसारखं खेळता येत नाही, मला कांबळी सारखं खेळता येत नाही तुमच्या क्रिकेट मध्ये अम्पायर असतो.. गेल्या निवडणुकीला आम्हाला थर्ड हम्पायर मिळाला असता तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो, पण तसं नाहीए आपल्याकडे क्रिकेटचे गुरू द्रोणाचर्य रमाकांत आचरेकर यांची आज 92 वी जयंती आहे. या दिवसाचं औचित्य साधून मुंबई क्रिकेटची पंढरी असलेल्या शिवाजी पार्क मैदान परिसरात सरांचं एक स्मारक उभारण्यात आलंय. गेट नंबर 5 जवळ उभारलेल्या या स्मारकाचं अनावरण सरांचा सर्वात आवडता शिष्य भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचलेल्या आचरेकर सरांच्या माजी विद्यार्थ्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. हे स्मारक उभारण्याची संकल्पना राज ठाकरे यांचीच. त्यामुळे इथं सरांचा पुतळा उभारण्याऐवजी क्रिकेटचं दर्शन घडवणारं एक अनोख स्मारक उभारण्यात आलंय. ज्यात दिग्गज क्रिकेटर्सची स्वाक्षरी असलेली बैट, स्टम्प्स, ग्लोव्हज आणि आचरेकर सरांची ओळख असलेली त्यांची रोमिओ हैट बसवण्यात आलीय.