Raj Thackeray : शेकाप वर्धापनदिन सोहळ्यात राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रातील मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करणारे मुख्यमंत्री, महाराष्ट्राबाहेरून आलेल्यांना मराठी शिकवण्याचा विचार करत नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले की, "आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरिता पायघड्या घालायच्या ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे." राज ठाकरे यांनी जनसुरक्षा विधेयकावरही तोफ डागली. प्रकल्पांना विरोध केल्यास सरकार 'Urban Naxal' ठरवून अटक करू शकते, अशी टीका त्यांनी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी कायदा न वाचता केलेल्या कमेंट्स असे म्हटले. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या थडग्यावर उद्योग उभे राहणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मानसन्मान राखूनच आणावे लागतील, असेही ते म्हणाले.