Raj Thackeray Mira Road | राज ठाकरे बोरिवलीत दाखल, मनसैनिकांकडून जंगी स्वागत, भगवी तलवार देणार भेट

राज ठाकरे मीरा रोड येथील सभेसाठी रवाना झाले आहेत. त्याआधी बोरिवलीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बोरिवलीतील देवीपाडा मेट्रो स्टेशनजवळ मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती. यावेळी राज ठाकरे यांना भगव्या रंगाची तलवार भेट देण्यात आली. या तलवारीवर 'महाराष्ट्रात फक्त मराठी' असा आशय लिहिलेला होता. काही दिवसांपूर्वी मीरा रोड येथे झालेल्या वादामुळे, विशेषतः परप्रांतीय मोर्चाच्या घटनेमुळे, तेथील वातावरण ढवळून निघाले होते. राज ठाकरे यांनी ५ तारखेला दिलेल्या आवाजाला आणि त्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्याला मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. "महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही पहिल्यांदा अशी घटना घडते की संपूर्ण मराठी माणूस एकटवतय," असे यावेळी सांगण्यात आले. नयन कदम, संदीप दळवी आणि कुणाल माहितेकर यांसारखे मनसे पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम उपनगरातील अनेक कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. महिला पदाधिकाऱ्यांनी आरतीचे ताट घेऊन आणि गुलाबाचा मोठा हार तयार करून राज ठाकरे यांचे स्वागत केले. ही गर्दी मराठी माणसाची एकजूट दर्शवते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola