Raj Thackeray | राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाकडून वॉरंट जारी

Continues below advertisement

नवी मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर कोर्टाने वॉरंट जारी केलं आहे. वाशी टोल नाक्यावर झालेल्या तोडफोड प्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. 26 जानेवारी 2014 रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी भडकावू भाषण केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता.

याप्रकरणी अनेक वेळा कोर्टात हजर राहण्यास सांगूनही राज ठाकरे हजर झाले नव्हते. त्यामुळे बेलापूर कोर्टाकडून आता वॉरंट जारी करण्यात आलं आहे. येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यादिवशी राज ठाकरे हजर न झाल्यास पुढील कारवाई केली जाईल असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram