Trailer Launch: 'हिंदीतले Yash Chopra म्हणजे मराठीतले Mahesh Manjrekar'- राज ठाकरे
Continues below advertisement
महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' (Punha Shivajiraje Bhosale) या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हजेरी लावली. 'हिंदी चित्रपट सृष्टीमधले यश चोपडा तसे मराठी चित्रपट सृष्टीमधले महेश मांजरेकर एवढं निश्चित आहे', अशा शब्दांत राज ठाकरे यांनी महेश मांजरेकर यांच्या कामाचे कौतुक केले. हा चित्रपट वर्तमान आणि भूतकाळाचा संगम असून, शेतकरी आत्महत्यांसारखा विषय हाताळण्याचे धाडस केल्याबद्दल ठाकरेंनी मांजरेकरांचे अभिनंदन केले. लोअर परळ येथील पीव्हीआरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. हा चित्रपट महाराष्ट्रातील जनता उचलून धरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या २००९ साली आलेल्या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement