Raj Thackeray on Ratan Tata : रतन टाटा कालवश, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रियाABP MAJHA

Continues below advertisement

Raj Thackeray on Ratan Tata : रतन टाटा कालवश, मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भावनिक प्रतिक्रियाABP MAJHA

देशाच्या उद्योगविश्वातील दिग्गज आणि पितृतुल्य व्यक्तीमत्त्व असणाऱ्या रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय उद्योगविश्व आणि सामान्य माणसं गेली अनेक वर्षे रतन टाटा यांच्या साधेपणाच्या, औद्योगिक यशाच्या कहाण्या ऐकत आली आहेत. त्यामुळेच रतन टाटा (Ratna Tata) यांचे निधन म्हणजे भारताच्या उद्योग जगतातील एका पर्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमध्ये राज ठाकरे यांनी रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व, त्यांच्याशी असलेले खास ऋणानुबंध यावर प्रकाश टाकला आहे.  राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलं? रतन टाटा यांचं निधन झालं. जवळपास 156 वर्षांची परंपरा असलेल्या एका उद्योग समूहाला ज्यांनी खऱ्या अर्थाने एकविसाव्या शतकांत आणलं आणि 'टाटा' ही नाममुद्रा ज्यांनी जगभर नेली ती रतन टाटांनी. बरं, हे सगळं करताना एखाद्या योगी माणसाची स्थितप्रज्ञताच ठेवायची ही टाटा समूहाची शिकवण पूर्णपणे अंगीकारायची हे खरंतर कठीण, पण ते रतन टाटांना जमलं.   रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आलीच ती जेआरडींसारख्या एका अत्यंत प्रतिभाशाली उद्योजकाकडून. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन सरकारांशी आणि 'लायसन्स राज'शी झगडा करत जेआरडीनी टाटा उद्योगाचे पंख विस्तारले, आणि ते पंख मधून मधून छाटण्याचे उद्योग त्या त्या वेळच्या सरकारने केले. योगायोग बघा की 'लायसन्स राज' संपायला आला आणि उदारीकरणाच्या उंबरठ्यावर असताना रतन टाटा टाटा समूहाचे अध्यक्ष झाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram